।। जय जानकी दुर्गेश्वरी ।।
असे मास तो अश्विनी पंचमीचा वरी पद्यसा – योग ये अमृताचा
मिळाली पदें चंदनाची आम्हाला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – १
पदीं घातली जोडवी नक्षीदार वरी रुणझुणें कांचनाचें नुपूर
कृपेंचा प्रसादा रुपें लाभ झाला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – २
पहा पाऊलांच्या तलीं व्यक्त झाली सुचिन्हे किती पाहिली भाग्यशाली
जणूं रुप तें व्यक्त केले – जगाला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – ३
जणूं “पींडी” ती “कालिका” भद्रकाली फुलांच्या सवे “पद्यजा” व्यक्त झाली
बहू प्रीय “वीणा” असे “शारदेला” नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – ४
असे राजसी, तामसी, सत्वगुणी अशीं व्यक्त रुपे त्रिमूर्ति भवानी
अरी मर्दना शंख तो फूंकीयेला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – ५
धनुष्यासवें पाश – परशु – करांत तसे यंत्र आणि करी मद्य-पात्र
अहा नाद घंटा तिने वाढविला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – ६
विमानीं ध्वजां कीर्तिची घेऊनिया करी विश्च-फेरी सुभक्ता बघाया
करोनी लिलां उद्धरी बालकाला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – ७
मनीं ध्यान जो “पाऊलांचे” करील तया “सावली” जानकीची मिळेल
असा मार्ग “बा” दाखवी सन्मनाला नमस्कार त्या “जानकी” पाऊलालां – ८
सदा माझ्या चित्तीं, पदकमल हे, नित्य असु दें । मुखीं गावी कीर्ति, जननी तुमची, हाचि वर दे ।।
घडावी ही सेवा, विमलपद सेवा, निशीं-दिनीं । कृपा व्हावी ऐसी, म्हणुनी विनंती, नम्र चरणी ।।
Leave a Reply