दक्षिण गुजरातमधल्या बिलिमोरा शहराच्या जवळच गणदेवी गाव आहे. हे तसं फार छोटं गाव, मात्र आता बर्‍यापैकी मोठं झालंय. गणदेवी हे तालुक्याचं ठिकाण. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत.

मुंबई-ठाण्याहून रस्त्याने गणदेवीचा प्रवास जेमतेम २०० किलोमिटर्सचा. म्हणजेच अगदी चार ते पाच तासात आपण तिथे पोहोचू शकतो. एका दिवसात गणदेवीला जाऊन येणे सहज शक्य आहे.

अहमदाबाद हायवेपासून आत सुमारे ८-१० किलोमिटरवर हे गाव आहे. जवळचे रेल्वे स्थानक बिलिमोरा, मात्र इथे फार कमी गाड्या थांबतात. नवसारी येथूनही गणदेवीला जाता येते. बिलिमोरा-नवसारी राज्य महामार्गावर हे गाव आहे.

मुंबई अहमदाबाद हायवेवर चिखली या गावातून डावीकडे वळल्यावर आपण चिखली – बिलिमोरा रस्त्याला लागतो. या रस्त्यावर सुमारे ८ किमी वर बिलिमोरा स्टेशन आहे. तिथे उजवीकडे वळल्यावर साधारण ७ किमीवर गणदेवी गाव आहे.

गावात शिरता शिरताच आपल्याला नदी लागते. या नदीवरील पुल ओलांडल्यावर उजव्या हाताला महादेवाचे मंदीर आहे. तसेच पुढे गेल्यावर १-२ मिनिटांवर एक शाळा लागते. या शाळेच्या बाजूलाच डावीकडे एक गल्ली जाते. या गल्लीतून आपण जानकी आईच्या स्थानाकडे जातो.

हे स्थान ‘श्रीयुत सगर’ यांच्या घरातील तळमजल्यावर आहे.